संसर्गाची गती कमी होत आहे – मुख्यमंत्री ठाकरे

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात अधिक कठोर लॉकडाउन लादण्याची गरज नाही, लोक निर्बंधांचे पालन करीत आहेत. असे वक्तव्य महाराष्ट्रातील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे

अपेक्षेपेक्षा कमी संसर्ग

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याप्रकारे राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, ती एप्रिल अखेर एक दशलक्ष लोकांना लागण होईल असे वाटत होते, परंतु फक्त 7 लाख लोकांना संसर्ग झाल्याने दिलासा मिळाला. ते म्हणाले की मागील वर्षीप्रमाणे यावेळेसही ते कोरोनाविरोधात एकत्र लढतील. ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात विलंब होऊ नये म्हणून आम्ही ऑक्सिजन प्लांट जवळच कोविड -19 केंद्रे सुरू करीत आहोत.

- Advertisement -

29 एप्रिलपासून महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंधात केली 15 दिवसांची मुदत वाढ

तत्पूर्वी, महाराष्ट्र सरकारने 29 एप्रिल ते 15 मे या कालावधीत लॉकडाऊन सारखी निर्बंध घातली आहेत. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा धोका असल्याने निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात तिसर्‍या लाटेच्या उपायोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.