खुनाचाच गुन्हा..उच्च न्यायालयाने फटकारले..

0

- Advertisement -

चेन्नई: कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशात होत असलेल्या विनाशास आपली संस्थाच (निवडणूक आयोग) जबाबदार असून निवडणूकांच्या प्रचारासाठी आपल्या संस्थेने परवानगी दिली असल्याने आपल्या अधिका-यांवर संभाव्य हत्येसाठीचा गुन्हा दाखल होऊ शकतो अशा संतापजनक भाषेत मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास फटकारले आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही देशात पाच राज्यात निवडणूका घेण्यात आल्या, त्यातील पश्चिम बंगालमधील काही टप्प्यांचे मतदान अजूनही सुरु आहे.

- Advertisement -

जर नागरिक जिवंत राहीले तरच ते आपल्या लोकशाही अधिकाराचा वापर करु शकतील. देशातील नागरिकांचे आरोग्य प्राथमिक असून घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांना याची आठवण करुन द्यावी लागते हे दुर्देव आहे असा खेद व्यक्त करीत मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी खेद व्यक्त केला आहे.

पाच राज्यांत होत असलेल्या निवडणूकांच्या प्रचारासाठी हजारोंच्या संख्येने सभा होत असताना आपली संस्था काही परग्रहावर होती का असा खोचक प्रश्न विचारत जर मतमोजणी आधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे तपशील सादर केले नाही तर न्यायालय मतमोजणीवर बंदी घालेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.