अखेर तालिबान संघटनेने स्थापले काळजीवाहू सरकार, वाचा कोण आहेत पंतप्रधान ?

0

- Advertisement -

काबुल : अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवित तालिबान संघटनेने तेथे आपले कार्यकारी काळजीवाहू सरकार अखरे स्थापन केले आहे. तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची काल (7 सप्टेंबर) रात्री उशिरा घोषणा केली आहे. त्यात जाहिर करण्यात आलेल्या माहितीनुसार तालिबान सरकारचे तसेच अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद (Mullah Mohammad Hassan Akhund) हे असणार आहेत. सध्या स्थापन करण्यात आलेले सरकार हे काळजीवाहू सरकार असून लवकरच कायम सरकार स्थापन कऱण्यात येणार असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.  (Finally Taliban announces new interim government, mullah mohammad hassan akhund to be prime minister of Afghanistan)

इस्लामिक नियम आणि शरियानुसार चालेल सरकार

तालिबानने आपले कार्यकारी सरकार स्थापनेच्या घोषणेसह चार पानांचा जाहीरनामा जारी केला आहे. ‘अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरातचे नेते’ अमीर उल मुमिनिन शेख उल हदीस हिबतोल्ला अखुंदजादा यांच्या स्वाक्षरीने हा जाहिरनामा जारी केला आहे. त्यात सरकारमध्ये सहभागी असलेले सर्वजण इस्लामिक नियम आणि शरिया कायद्यानुसार काम करतील आणि देशाला पुढे नेतील. कार्यकारी सरकार लवकरच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरुवात करेल असे सांगण्यात आले आहे. सरकार इस्लामिक नियम आणि शरिया कायद्यानुसार चालवेल असेही त्यात म्हटले आहे.

कोण आहेत मंत्रिमंडळात ?

मुल्ला मोहम्मद हसन अखूंद-पंतप्रधान

मौलवी अब्दुल सलाम हनाफी- उपपंतप्रधान

मुल्ला अब्दुल गनी बरादर- उपपंतप्रधान

खैरउल्लाह खैरख्वा- माहिती मंत्री

अब्दूल हकीम- कायदामंत्री

मुल्ला याकूब – संरक्षणमंत्री

- Advertisement -

मुल्ला सिराजुद्दीन हक्कानी-गृहमंत्री

मुल्ला अमीरखान मोताकी- परराष्ट्र व्यवहारमंत्री

मुल्ला हेदायतुल्ला बद्री- अर्थमंत्री

शेख मुल्ला नूरुल्ला मुनीर- शिक्षणमंत्री

मुल्ला खैरुल्ला खैरखाह- माहिती आणि संस्कृतीमंत्री

शेख मुल्वा नूर मोहम्मद साकीब-हज आणि एंडोमेंट्स मंत्रालयाचे प्रमुख

मुल्ला अब्दुल हकीम शरी-न्यायमंत्री

कोण आहेत मुल्ला हसन अखूंद

मुल्ला हसन अखूंद हे तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या दहशतवाद्यांची यादीत यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच असून गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत. पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.