कमी उत्पन्न गटातील 5.5 कोटी ग्राहकांना एयरटेल देणार 49 रूपयांचा पॅक मोफत

0

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जनता आणि कंपन्या आपापल्या पद्धतीने गरजू लोकांना मदत करत आहेत. यात आता दिग्गज टेलिकॉम कंपनी एयरटेलचा (Bharti Airtel) पण समावेश झाला आहे. एयरटेलने आपल्या कमी उत्पन्न असणार्‍या ग्राहकांना या संकटाच्या काळात आपल्या नेटवर्क सोबत कायम जोडले राहण्यासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.

कंपनी कोरोना संकटाच्या दरम्यान लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवण्यात मदत करण्यासाठी आपल्या नेटवर्कमधील सुमारे 5.5 कोटी ग्राहकांना 49 रुपयांचा रिचार्ज पॅक मोफत देणार आहे. सोबतच, 79 रुपयाचे रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना दुप्पट फायदा देणार आहे.

एयरटेल खर्च करणार 270 कोटी रुपये

- Advertisement -

आपल्या 5.5 कोटी अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना 49 रूपयांचा पॅक विनामूल्य देणार असून, हा पॅक 38 रूपयांचा टॉकटाइम, 100 एमबी इंटरनेट सह 28 दिवसांच्या वैधतेसह मिळणार आहे, असे एयरटेल ने रविवारी जाहीर केले आहे. कंपनीचे यासाठी 270 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे समजते.

पुढच्या आठवड्यात आपोआप होणार रिचार्ज

एयरटेल ग्राहकांना या सवलती पुढच्या आठवड्यापासून मिळणार आहेत. या योजनेतून सुमारे 5.5 कोटी गरीब ग्राहकांना कंपनी सक्षम बनवणार आहे. यात ग्रामीण भागातील लोकांचा जास्त समावेश असेल. एयरटेल आपल्या ग्राहकांना कोविड संबधित सर्व आवश्यक माहिती देणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.