गुगल वापरत असाल तर सावधान, कर्मचारी ऐकतात तुमचे संभाषण

0

- Advertisement -

टेक: आपण Google वापरत असल्यास सतर्क व्हा. गुगल या दिग्गज कंपनीच्या प्रतिनिधींनी माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीसमोर (Parliamentary Standing Committee) कबूल केले की कंपनीचे कर्मचारी गूगल असिस्टंटमार्फत ग्राहकांच्या संभाषणांची रेकॉर्डिंग ऐकतात.

बिझनेस टूडेच्या अनुसार, समितीच्या सूत्रांनी सांगितले की, जेव्हा यूजर “OK, Google” म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पावर्ड गूगल असिस्टेंट सोबत बोलतात तेव्हा गुगलचे कर्मचारी त्या गोष्टी ऐकत असतात.

समितीतील सदस्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी याबाबत गुगलच्या प्रतिनिधीला विचारले असता, उत्तरात गुगलने कबूल केले की कधी-कधी गुगल असिस्टेंटला बोलत नसतानाही आम्ही यूजरचे बोलणे रेकॉर्ड करतो. कंपनीने समितीला सांगितले की, आम्ही संवेदनशील गोष्टी ऐकत नाही, फक्त सामान्य संवाद रेकॉर्ड करण्यात येतात.

मात्र, गुगलने हे स्पष्ट केले नाही की, ते अखेर संवेदनशील गोष्टी कोणत्या आहेत आणि सामान्य गोष्टी कोणत्या आहेत, हे कोणत्या आधारावर ठरवतात. समितीने या मुद्द्याला गंभीरतेने घेतले असून, या प्रकरणाला गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन मानण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष शशि थरूर अंतिम अहवाल तयार करून सरकारला देतील.

- Advertisement -

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.