अबब: मोबाईल अप्लिकेशनद्वारे लावला 150 कोटींचा चुना, 5 लाख लोकांची झाली फसवणूक

0

- Advertisement -

नवी दिल्ली: मोबाईल अप्लिकेशनद्वारे गुंतवणूकीचे प्रलोभन दाखवून तब्बल 5 लाख लोकांना जवळपास 150 कोटी रुपयांना फसविणा-या एका सायबर चोरांच्या टोळीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून विषेश म्हणजे अटक केलेल्यांमध्ये दोन चार्टड अकांऊटट आहेत.    दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापाठीमागे काही चीनी नागरिकांचाही सहभाग आहे.

पोलिसांनी त्यांच्याजवळून 97 लाख रुपये रोख जप्त केले असून इतर गुंतवणूक केलेले पैसे आभासी चलनाद्वारे (Cryptocurrency) परदेशात पाठविले जात होते.

देशातील विविध शहरांतून पावर बॅंक, इझी प्लॅन आणि सन फॅक्टरी अशा विविध मोबाईल अप्लिकेशनद्वारे ते लोकांना गुंतवणूक करण्याचे प्रलोभन दाखवून पैसे उकळत होते. आम्ही ह्या अप्लिकेशनला डाऊनलोड करून त्यात गुंतवणूक करून या लोकांच्या गुन्हा करण्याची पद्धती उघडकीस आणली आहे असे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे डेप्युटी कमिशनर अनियेश रॉय यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकत्ता येथील कुलबेरिया परिसरात या लोकांचे मुख्य कार्यालय होते. तेथून 9 जणांना पकडण्यात आले तर 2 जणांना दिल्ली आणि गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. तसेच यासर्व फसवणूकीच्या रॅकेट पाठीमागे 5 ते 6 चीनी नागरिक असून ते भारतात राहून गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या दोन चार्टड अकाऊंटंटपैकी एक गुरुग्राममधील रहिवासी अविक केडियाने जवळपास 110 शेल कंपन्या बनवून त्या चीनी नागरिकांना ट्रान्सफर केल्या आहेत. तो एका कंपनीचे 3 लाख रुपये याप्रमाणे पैसे आकारत असे.

- Advertisement -

कशी होत होती फसवणूक

सर्वात प्रथम हे लोक नागरिकांना आपले अप्लिकेशन त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगत होते. त्यानंतर अप्लिकेशन डाऊनलोड केलेल्या नागरिकांचा डेटा चोरी करून तो देशाबाहेरील अर्थात चीनमधील आयपी अॅड्रेस  असलेल्या सर्व्हरला पाठवित असत. या अप्लिकेशनद्वारे  प्रत्येक दिवशी दर तासाला मनी पुश स्किम चालविली जात होती. त्यालाच हे लोक एक बिझीनेस मॉडेल म्हणून नागरिकांसमोर दाखवित होते.

यात लोकांना प्रथम गुंतवणूक केल्यानंतर 10 टक्के रक्कम परत दिली जायची आणि आपल्या मित्र नातेवाईकांमध्ये या बिझीनेसची लिंक शेअर करण्यास सांगितले जायचे. या अप्लिकेशनमध्ये कंपनी चालविणारे लोक हे बेंगळूरु मधील एका चार्जिंग व्यावसायात असल्याचे सांगितले जायचे.

जेव्हा आम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांचा माग  काढला तेव्हा लक्षात आले की हे कोट्यावधी पैसे एका पेमेंट गेटवे मधून विविध 25 शेल (बनावट) कंपन्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असल्याचे निदर्शनास आले, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.