बिटकॅाईन हे वैध चलन, या’ देशाने दिली जगात प्रथमच मान्यता

0

- Advertisement -

जगभरात क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलन प्रचलित झाले आहे. त्यात जगभरातील अनेक उद्योगपती, राजकारणी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे. तरी परंतु जगभरातील अनेक देशांनी अशा आभासी चलनांना (Cryptocurrency) वैध चलन म्हणून संमती दिलेली नाही.

परंतु अल साल्वाडोर (El Salvador) या देशाने जगभरातील अनेक देशांना मागे सोडत प्रथमच बिटकॉईन (Bitcoin) या आभासी चलनास (Cryptocurrency) त्यांच्या देशात वैध चलन म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता देण्याचे एक विधेयक अल साल्वाडोर या देशाच्या संसदेने संमत केले आहे.

मायामी येथे गेल्या महिन्यात झालेल्या बिटकॅाईन कान्फरन्स मध्ये अल साल्वाडोर चे राष्ट्रपती नयीब बुकेले यांनी बिटकॅाईनला वैधता मिळवून देण्याबाबत जाहीर चर्चा केली होती. देशाच्या औपचारीक आर्थिक व्यवस्थेत अशा चलनास आणल्यास अनेक लोक मुख्य आर्थिक व्यवस्थेत येऊ शकतात. तसेच त्यातुन रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यानंतर त्यांनी  5 जून रोजी बिटकॅाईन ला देशात वैध चलन म्हणून मान्यता देण्यासाठी संसदेत लवकरच विधेयक आणले जाईल अशी घोषणा केली होती. आता या विधेयकाच्या संमती नंतर आता 90 दिवसांत यासंबंधीचा कायदा लागू होणार आहे.

- Advertisement -

तसेच त्यांनी देशातील आर्थिक व्यवस्थेत अमेरिकेचे डॅालर हे मुख्य वैध चलन राहील, त्याला काहीही धोका नसून नागरिक बिटकॅाईनचा उपयोग वैकल्पिक चलन म्हणून करू शकतात असे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.