Facebook पाठोपाठ Google ही भारतात सुरु करतेय ‘ही’ आर्थिक सुविधा

0

- Advertisement -

मुंबई: नुकतेच फेसबुकने भारतात कर्ज वितरण व्यवसायात उतरचण्याची घोषणा केली आहे. आता पेमेंट सेवेत आधीच भारतात व्यवसाय करीत असलेल्या दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपनी गुगल Google, ही कंपनी बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच मुदत ठेव योजना (Fixed Deposit) योजना चालवणार आहे.

आता बॅंकांमध्ये न जाता ग्राहक घरातू बसूनच Google Pay द्वारे मुदत ठेव FD खरेदी करू शकतील. भारतातील Google च्या ग्राहकांसाठी ही विशेष योजना सुरू होणार असल्याचे वृत्त मिंट या वृत्तपत्राने दिले आहे. गुगलने त्यासाठी एक आर्थिक तंत्रज्ञान सेवा पुरविणारी कंपनी ‘सेतु’ बरोबर करार केला आहे.

फेसबुकचा भारतात नवा डाव: व्यवसायातही उतरण्याची केली घोषणा

सेतु कंपनीच्या API च्या मदतीने भारतातील ग्राहकांना ही योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगल स्वतःच्या मुदत ठेव योजना चालविणार नसून सुरवातीला इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंकेच्या मुदत ठेव योजना दिल्या जाणार आहेत. तसेच अन्य बॅंकांच्याही अशा प्रकारच्या योजना गुगलद्वारे दिल्या जातील.

यात सर्वप्रथम एक वर्षाच्या मुदत ठेवीच्या योजना सुरु करण्यात येणार असून ग्राहकांना या योजनेवर जास्तीत जास्त 6.35 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. गुगल पेच्या ग्राहकांना इक्विटास बॅंकेच्या 7 ते 29 दिवस, 30 ते 45 दिवस, 46 ते 90 दिवस, 91 ते 180 दिवस, 181 ते 364 दिवस आणि 365 दिवस अर्थात एक वर्ष अशा विविध कालावधीच्या मुदत ठेव योजना उपलब्ध असतील.

- Advertisement -

KYC करणे जरुरी

गुगल सुरु करीत असलेल्या या मुदत ठेव योजनेत सहभागी होणा-या ग्राहकांना आपला आधार क्रमांक देऊन आपली KYC प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. आधार नंबर दिल्यावर ग्राहकांच्या मोबाईलवरून KYC प्रक्रिया पुर्ण होईल. मात्र या साठी सेतु सध्या API साठी बीटा आवृत्ती तयार करीत असून ती लवकरच उपलब्ध होणार आहे.

गुगलच्या ग्राहकांना गुगल पे द्वारे मुदत ठेव योजनेत पैसे गुंतविता येतील तर योजनेचा कालावधी संपल्यानंतर ते पैसे व्याजासह गुगल पे खात्यात हस्तांतरीत करण्यात येतील. यात इक्विटास बॅंकेचा काहीच संबध असणार नाही.

अशा प्रकारच्या मुदत ठेव योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंक आणि एयु स्मॉल फायनान्स बॅंक यांच्या बरोबरही गुगल कंपनी चर्चा करीत आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.