विजेसाठीही मारा आता Recharge Voucher, प्रत्येकाच्या घरी बसवणार pre- paid Smart Meter

0

- Advertisement -

विजेचा वापर हा शेती, उद्योगधंदे, घर अशा सर्वत्र वापर होत असतो. परंतु सर्वजण वेळेत वीजबिल भरतात असे नाही. त्यामुळे साहजिकच वीज वितरण कंपन्या या तोट्यामध्ये असतात. त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात ‘pre-paid smart meter’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे काम करेल ‘pre-paid Smart Meter’
याअगोदर आपल्या घरी कंपनीने मीटर बसवलेला होता. ज्याच्यामुळे ग्राहकाने किती युनिट विजेचा वापर केला हे समजत असत. आता त्या जुन्या मीटर च्या जागी हा नवीन ‘pre-paid Smart Meter’ बसवण्यात येईल. हा मीटर मोबाईल सारखाच काम करेल तुम्ही जितका विजेचा वापर करता तितक्या रुपयांचा रिचार्ज तुम्हाला करावे लागेल. सरकारच्या मते यामुळे वीज वितरण कंपनीची स्थिती निश्चितच सुधारेल.

- Advertisement -

सुरुवातीच्या टप्प्यात याठिकाणी बसवण्यात येणार ‘pre-paid Smart Meter’
सध्या काही निवडक शहरांमध्ये हे मीटर बसवण्यात आले आहेत. ऊर्जा मंत्रालयानं (Power Ministry) सर्व केंद्रीय मंत्रालयांना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालच्या संस्थांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा आदेश दिला आहे. शहरी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय मंडळं आणि महामंडळांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यास सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये प्रीपेड मीटर बसवल्यानंतर ते धोरण देशभरात लागू केले जाणार आहे. कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांच्या घरी ‘pre-paid Smart Meter’ बसवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा. किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.