केंद्र सरकारचा ट्विटरला नोटीसीद्वारे निर्वाणीचा इशारा

0

- Advertisement -

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि ट्विटर या सामाजिक माध्यम कंपनीतील वाद आता शिगेला पोहोचला आहे. गेल्या 26 मे पासून लागू झालेल्या नव्या माहीती तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यासाठी अखेरची संधी देत निर्वाणीचा इशारा दिला आहे.

माहीती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरच्या अमेरिकेतील कार्यालयालास शनिवारी (5 जून) रोजी नोटीस पाठविली आहे. त्यात अत्यंत कडक शब्दांत नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमांना अनुसरून ट्विटरने अजूनही कार्यवाही केलेली नाही. त्यांना एक शेवटची संधी देण्यात येत असून नियमांच्या अंतर्गत दिलेल्या सुचनांप्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्य़था माहीती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ७९ अंतर्गत ट्विटरला देण्यात आलेलं संरक्षण काढून घेतले जाईल आणि माहीती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार कारवाई होण्यास ट्विटर पात्र ठरेल’, असा निर्वाणीचा इशारा नोटीशीत देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान आज (शनिवार) सकाळपासून ट्विटरकडून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या ट्विटर हँडलवरची ‘ब्ल्यु टिक’ हटवली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर अकाउंटवरची ब्लूट टिक हटवण्यात आली होती परंतु त्यानंतर ती पुन्हा जोडण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खात्यावरची ब्लू टिक देखील हटवण्यात आली आहे. संघाशी संबंधित इतरही काही व्यक्तींच्या अकाउंटची ब्लूट टिक काढण्यात आली आहे.

ट्विटरने ब्ल्यु टिक हटविण्याच्या कारवाईमुळे केंद्र सरकारबरोबरचा संघर्ष आणखीनच जास्त वाढणार आहे असे दिसून येत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.