Google Maps आणत आहे नवीन फिचर, ज्याने वाचतील तुमचे पैसे; जाणून घ्या पूर्ण माहिती

0

- Advertisement -

टेक:  लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना वाटेत लागणार्‍या टोलनाक्यांवर भराव्या लागणार्‍या टॅक्स मुले बरेच लोक वैतागून जातात. देशातील रस्त्यांची अवस्था पाहता भरलेला टोल सार्थकी लागला असे वाटत नाही.  मात्र, आता चिंता करण्याचची काही गरज नाही. लवकरच गुगल तुम्हाला सांगले की कोणत्या मार्गावर टोल आहेत आणि तिथे किती टॅक्स भरावा लागेल.

Google Maps एक महत्वाच्या अपडेटवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रवासाचे अधिक चांगले नियोजन करण्यास मदत करेल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्या रस्त्यांना टोल गेट आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला किती टोल टॅक्स भरावा लागेल, ही माहिती गूगल मॅपच देणार आहे. प्रवासात तुम्हाला टोल गेट रस्ता घ्यायचा आहे की नाही याचा निर्णय घेण्यास हे फिचर मदत करेल.सध्या हे फिचर सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि हे फिचर सर्व देशांमध्ये कधी उपलब्ध होईल हे सांगणे फार घाईचे होईल.

ठरवत येईल योग्य प्रवास मार्ग

Google Maps हे येणारे फिचर वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बऱ्याचदा आपण प्रवासाला निघतो तेव्हा वाटेत अनेक टोल नाके पाहून आपल्याला धक्का बसतो. त्यामुळे अनेकवेळा शेकडो रूपयांचा भुर्दंड आपल्याला बसतो. Google Maps च्या या फिचरमुळे टोलवर आपले किती पैसे खर्च होणार आहेत आणि आपल्या प्रवासी मार्गावर किती टोलनाके येणार आहेत हे आपल्याला समजेल. त्यामुळे जास्त टोलनाके असलेला मार्ग निवडायचा की नाही हे लवकर ठरवता येईल.

- Advertisement -

Google Maps Preview Program च्या सदस्यांनी केली चाचणी

गुगलने अद्याप या वैशिष्ट्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. परंतु अँड्रॉईड पोलिस या टेक ब्लॉगच्या वृत्तानुसार, गुगल मॅप्स प्रीव्यू प्रोग्राम मधील काही खास सदस्यांना हे फिचर टेस्ट करण्यास दिले होते. याद्वारे प्रवास मार्गावरील रस्ता, पूल आणि टोल टॅक्सची संपूर्ण माहिती मिळेल. गुगल मॅप्स प्रीव्यू प्रोग्राममधील सदस्यांनी सांगितले की, गूगल मॅप वाटेत असणार्‍या सर्व टोल कराची अचूक माहिती देत आहे.

सध्या गुगलने यावर कोणतीही अधिकृत सूचना जाहीर केली नाही. तसेच हे फिचर भारतात कधी उपलब्ध होई याचीही माहिती त्यांनी दिली नाही.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.