महागड्या फोनलाही टक्कर देतो ‘हा’ भारतीय बनावटीचा स्मार्टफोन, फक्त 8,999 मध्ये मिळते 6GB रॅम आणि 5000 mAh बॅटरी

0

- Advertisement -

टेक: सध्याच्या युगात सर्वांकडे चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन असणे गरजेचे बनले आहे. मात्र काही जणांचे बजट कमी असल्यामुळे ते महागडा फोन खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता चिंता करायची काही गरज नाही. मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने कमी किमतीत एक जबरदस्त फोन लॉंच केला आहे. या फोनची वैशिष्ट्य महागड्या फोनला टक्कर देणारी आहेत. जर तुम्ही एखादा चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठीच आहे.

थोडक्यात वैशिष्ट्य:

मायक्रोमॅक्स कंपनीने Micromax IN 2b नावाचा फोन लॉंच केला आहे. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी आणि रॅम. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. हा फोन दोन स्टोरेज प्रकारात उपलब्ध असून, 4GB+64GB आणि GB+64 GB या दोन प्रकारात मिळतो. फोनच्या 4GB मॉडलची किंमत 7,999 रुपये असून 6GB मॉडलची किंमत 8,999 रुपये आहे.

कधी आणि कुठे होईल उपलब्ध:

ग्राहक हा फोन काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात घरी आणू शकतात. हा फोन 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. या फोनची संपूर्ण वैशिष्ट्ये कशी आहेत ते जाणून घेऊया.

डिस्प्ले आणि प्रोसेसर:

मायक्रोमॅक्स इन 2 बी मध्ये 6.5-इंच मिनी ड्रॉप एचडी+ डिस्प्ले आहे, ज्यात 400 निट्स ब्राइटनेस मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर काम करतो, तसेच 2 वर्षापर्यंत ओएस अपडेट करण्याचे कंपनीने हमी दिली आहे. यात एआरएम कॉर्टेक्स ए 75 चिपसेट(ARM Cortex A75) आणि यात 6 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.

- Advertisement -

कॅमेरा:

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो 13 मेगापिक्सलच्या प्राथमिक सेन्सरसह येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे हा फोन FHD व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह येतो आणि यात प्ले आणि पॉज रेकॉर्डिंग फीचर देखील आहे.

बॅटरी आणि कनेक्टीविटी:

या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, टाइप-सी चार्जिंग, 3 इन 1 सिम स्लॉट, ब्लूटूथ 5.0, 5Ghz वाय-फाय आणि VO-Wifi सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.