ट्विटर आणत आहे नवीन फिचर, आता ‘ट्विट्स’ थेट इंस्टाग्राम स्टोरीज वर शेअर करता येणार

0

- Advertisement -

टेक:मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आता एक नवीन अपडेट जारी केले आहे. आपण आता आपले ट्विट थेट इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करू शकता. मागील वर्षापासूनच ट्विटरने या वैशिष्ट्याची चाचणी सुरू केली होती. जे लोक नियमितपणे त्यांचे ‘ट्विट’ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करतात त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट कामी येणार आहे. हे फिचर येण्यापूर्वी वापरकर्ते त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होते.

ट्विटरचे हे नवीन अपडेट सध्या केवळ iOS वापरकर्त्यांसाठीच आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना हे फिचर वापरण्यासाठी अजून बराच काळ वाट पहावी लाहू शकते.

अशा पद्धतीने करता येईल ट्विट शेअर

आपणही ट्विटरचे हे नवीन वैशिष्ट्य वापरू इच्छित असाल तर, प्रथम आपले ट्विटर अ‍ॅप अपडेट करा आणि आपण इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करू इच्छित ट्विटच्या शेअर बटणावर क्लिक करा आणि नंतर इंस्टाग्राम निवडा.

- Advertisement -

एकदा ट्विटरवर इन्स्टाग्रामची निवड झाली की ट्विट अॅपमधील इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये ड्राफ्ट रुपात हे ट्विट सेव्ह केले जाईल. त्यानंतर आपण इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडून ही स्टोरी प्रकाशित (Publish) करू शकता. प्रकाशित करण्यापूर्वी आपण त्यात स्टिकर किंवा नोट्स देखील जोडू शकता.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, इन्स्टाग्राममध्ये शेअर केलेल्या ट्विटवर क्लिक करून, कोणीही ट्विटरवर जाऊ शकत नाही. या व्यतिरिक्त आपण इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये संरक्षित ट्विट (Protected Tweets) देखील शेअर करू शकत नाही.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.