चीनमुळे जगावर पुन्हा संकंट, अनियंत्रित रॅाकेट कोसळणार; पण कुठे ?

0

- Advertisement -

चीन उभारत असलेल्या अंतराळ स्थानकासाठी पाठवलेले रॉकेट अंतराळात प्रवेश केल्यावर त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे ते शनिवार (8 मे) रोजी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे अमेरिकेच्या पेन्टॅगॅान मधील अवकास संरक्षण विभागाने म्हटले आहे.

पृथ्वीपासून  170 किलोमीटर ते 372 किलोमीटर अंतरावर म्हणजेच अवकाश शास्त्र भाषेत लोअर ऑर्बिटमध्ये तासाला 25 हजार किलोमीटर इतक्या वेगाने चकरा मारत आहे.100 फूट लांब असलेलं 21 टन वजन असलेले लॉन्ग मार्च 5बी हे रॉकेट सध्या अनियंत्रित अवस्थेत आहे.

चीनच्या तियानहे या अंतराळ प्रक्षेपण स्थानकावरून सोडण्यात आलेले हे रॅाकेट त्यावरील नियंत्रण सुटल्याने ते पृथ्वीच्या कक्षेत कुठे प्रवेश करू शकते ह्याचा अंदाज येत नसल्याची स्पेस ट्रॅक आणि एअरोस्पेस या अवकाश अभ्यास करणा-या वेब पोर्टलनी माहीती दिली आहे.

- Advertisement -

हे रॅाकेट न्युयॅार्क, माद्रिद, दक्षिण चिली, न्युझीलंडच्या वेलिंग्टन या भागात कोसळू शकते असा अंतराळ संशोधकांचा अंदाज आहे.

अंतराळात नवीन अंतराळ स्थानक उभारण्यासाठी २०२२ पर्यंत ११ रॉकेट पाठवण्याची चीनची योजना आहे. यापूर्वीही पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरामध्ये चीनचं एक रॉकेट पडले होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.