नाव बदलून ‘पबजी’ लवकरच परतणार…

0

- Advertisement -

भारतातील PUBG Mobile चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. PUBG Mobile भारतात लवकरच पुन्हा लॉंच होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. PUBG च्या कंपनीने सर्व सोशल मीडिया च्या अधिकृत पेजेसवर, यूट्यूब चॅनल आणि वेबसाइटवर नवीन पोस्टर रिलीज केले असून, आता हा गेम नाव बदलून Battlegrounds Mobile India नावाने भारतात परतणार आहे.

पबजी इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कमिंग सून ( कमिंग सून) लिहिलेले आहे. या व्यतिरिक्त पीयूबीजी मोबाइल इंडियाचे अधिकृत पेजचे नाव देखील बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) असे बदलण्यात आले आहे.

- Advertisement -

कंपनीने आपल्या यूट्यूब चॅनल वर सुद्धा नवीन पोस्टर टाकले आहे. मागच्या आठवड्यात गेमच टीजरही रिलीज केला होता, परंतु नंतर लगेच हटवण्यात आला होता.

भारतात नेमकं कधी गेम लॉंच होईल याची अधिकृत माहिती पुढे आली नसली तरीही होणार्‍या हालचालींचा वेग पाहता PUBG लवकर्छ भारतात परतणार असल्याचे दिसते. हा गेम भारतता पुन्हा जून महिन्यात वापसी करेल असा नादाज अनेक टेक एक्स्पर्ट्स लावत आहेत.

मागच्या वर्षी सरकारने नागरिकांच्या डाटा सुरक्षेच्या कारणांवरून पबजी समवेत 117 चीनी अॅप्सवर बंदी घातली होती.आता पुन्हा भारतात गेम लॉंच करण्यापूर्वी कंपनीला सर्व सुरक्षा संबधी नियमांचे पालन करणार असल्याचे स्पष्ट करावे लागेल. यानंतरच भारतात परत येण्यासाठी परवानगी मिळू शकते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.