रियलमी कडून त्यांचा पहिला लॅपटॉप झाला लाँच , जाणून घ्या कोणते असणार फिचर

0

- Advertisement -

रियलमी ने भारतात आपला पहिला लॅपटॉप रियलमी बुक लाँच केला आहे. रियलमी बुक ची टक्कर एपल मैकबुक प्रो बरोबर असणार आहे. एपल च्या तुलनेत रियलमी चा डिसप्ले मोठा आणि डिजाईन स्लिम असणार आहे. याचबरोबर पावर बटन मध्ये फिंगर प्रिंट सेन्सर दिल गेलं आहे. शानदार आवाजासाठी हरमन चे स्पिकर लावले गेले आहेत.

जाणून घ्या रियलमी बुक मध्ये कोणकोणते असणार नवीन फिचर

१) डिजाईन :- हा लॅपटॉप एपल च्या तुलनेत खूपच स्लिम असणार आहे. रियलमी आणि एपल मॅकबुक हे दोन्ही वजनाने मात्र बऱ्यापैकी एक सारखेच आहेत. कंपनीने लॅपटॉप ला मजबुतपणा देण्यासाठी मेटल बॉडी चा वापर केला आहे.

२)डिसप्ले :- लॅपटॉप ला 14- इंच 2K फुल व्हिजन IPS डिसप्ले दिला गेला आहे. ज्याची पिक ब्राईटनेस 400 नीटस आहे. डिसप्ले अँस्पेक्ट रेशियो 3:2 तर बॉडी टू स्क्रीन रेशियो 90% इतका आहे. एपल मैकबुक च्या तुलनेत 8% जास्त आहे.

३) प्रोसेसर:- 11th जनरेशन इंटेल कोर i5 चिपसेट बरोबर आयरीस XE इंटिग्रेटेड ग्राफिक्स चा वापर केला गेला आहे. लॅपटॉप मध्ये 512 GB पर्यंत SSD स्टोरेज आणि 8GB रॅम मिळणार आहे. यामध्ये ड्युअल फॅन सिस्टीम दिली गेली आहे जी लॅपटॉप का गरम व्हायला देणार नाही.

- Advertisement -

४) बॅटरी :- 65 वॅट सुपर फ्लॅश चार्जे टेक्नॉलॉजी ला बॅटरी सपोर्ट करते. यामुळे 30 मिनिटात बॅटरी 50% चार्ज होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सिंगल चार्जे मध्ये बॅटरी 11 तास चालणार आहे.

५) साउंड:- चांगल्या साउंड क्वालिटी साठी यांच्यामध्ये हरमन कंपनीचे दोन स्पिकर दिले गेले आहेत. जे DTS ऑडिओ सपोर्ट बरोबर येतात. याबरोबरच पावर बटन ला फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिल गेलं आहे.

काय असेल रियलमी लॅपटॉप ची किंमत

याला दोन वैरीएंट मध्ये लाँच केल गेल आहे. इंटेल कोर i3 चिपसेट, 8GB रॅम आणि 256 SSD वैरीएंट ची किंमत 44,999 रुपये इतकी असणार आहे. तर इंटेल कोर i5 चिपसेट, 8GB रॅम आणि 512GB SSD वैरीएंट ची किंमत 56,999 इतकी असणार आहे. दोन्ही वैरीएंट ब्लु आणि ग्रे कलर मध्ये उपलब्ध असणार आहेत. याची विक्री 30 ऑगस्ट रात्री 12 पासून सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.