‘या’ तारखेला होणार Redmi Note 10एस लॅांच, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

0

- Advertisement -

स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमी ( Xiaomi) ने रेडमी नोट 10 मालिकेतील नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस भारतात लॉंच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या स्मार्टफोनचा लॉंच इवेंट 13 मे दुपारी 2 वाजता होणार आहे. शाओमीने या साठी ‘Special #LaunchFromHome Event’ चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कंपंनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि इतर अधिकृत सोशल मीडियावर होणार आहे.

या मालिकेतील रेडमी 10, रेडमी नोट 10 प्रो, रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हे मोबाइल्स कंपनीने भारतात अगोदरच लॉंच केले आहेत.

शाओमी ने हा फोन चीन मध्ये अगोदरच लॉंच केलेला होता. रेडमी नोट 10 एस भारतात तीन स्टोरेज प्रकारात येण्याची शक्यता आहे. त्यात 6 जीबी+64जीबी, 6 जीबी+128जीबी आणि 8जीबी+128 जीबी प्रकारांचा समावेश असू शकतो. यासोबतच, निळा, गडद करडा आणि पांढर्‍या रंगात मोबाइल उपलब्ध होऊ शकतो.

- Advertisement -

फोनमध्ये असतील 5 कॅमेरा

फोनमध्ये सेक्युरिटी साठी एक फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार आहे.  मागच्या बाजूला 4 कॅमेरे असतील. त्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य, 8 MP चा वाइड लेंस, 2 MP चा डेप्थ सेंसर आणि 2 MP चा मॅक्रो सेंसर असे चार कॅमेरे असतील. फोन मध्ये सेल्फीसाठी 13 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सोबतच 5000 mAh ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी दमदार बॅटरीही आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.