स्मार्टफोन नंतर आता Reliance Jio चा सर्वात स्वस्त लॅपटॉप, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशातील अग्रगण्य दुरसांचार कंपनी Reliance Jio ने गेल्या काही दिवसांपूर्वी स्वस्त 4G स्मार्टफोन Jio Phone Next ची घोषणा केली होती, आता कंपनी देशातील सर्वात स्वस्त Laptop लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येते आहे.

Bureau of Indian Standards (BIS) वेबसाइटने Jio कंपनी आता लॅपटॉप सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत असल्याचे प्रदर्शित केले आहे. Jio लवकरच स्वस्त आणि दमदार फीचर्स असलेला JioBook Laptop लॉन्च करणार असल्याची जोरदार चर्चा नेटीझन्स मध्ये सुरू आहे. मात्र ,  कंपनीने त्याच्या लॉन्चची तारीख किंवा वैशिष्ट्ये अधिकृतपणे उघड केलेली नाहीत.

यापुर्वी Jio Phone विक्रीसाठी 10 सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात येणार होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव ते होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

टिपस्टार मुकुल शर्माने जिओबुक लॅपटॉप संदर्भात ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की जिओबुक लॅपटॉप तीन मॉडेल NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM मध्ये सूचीबद्ध आहे. असा अंदाज लावला जात आहे की हे तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये लॉन्च केले जाऊ शकते.

JioBook Laptop: संभाव्य तपशील
JioBook Laptop बद्दल उघड झालेल्या माहितीनुसार, JioBook हा लॅपटॉप 1,366 × 768 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह HD डिस्प्लेमध्ये दिला जाऊ शकतो. हा लॅपटॉप स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरवर काम करतो आणि याला 4GB LPDDR4x रॅम दिली जाऊ शकते. याशिवाय 64 GB ईएमएमसी स्टोरेज उपलब्ध असेल. कनेक्टिव्हिटीसाठी, मिनी एचडीएमआय कनेक्टर , ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्ट सारखे फीचर्स यात दिले जाऊ शकतात.  JioBook लॅपटॉप मध्ये JioStore , JioMeet आणि JioPages सारखे अॅप्स असतील. याव्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टचे सर्व साफ्टवेअर्स ही यात उपलब्ध असू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.