सॅमसंगचा सर्वात स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, सिम कार्डचा देखील आहे सपोर्ट

0

- Advertisement -

Tech: सॅमसंगने भारतात आपली दोन नवीन टॅबलेट लॉन्च केली आहेत ज्यात सॅमसंग Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite चा समावेश आहे. हे दोन्ही टॅब मागील महिन्यात युरोपमध्ये लाँच झालेले आहेत. यापैकी Galaxy Tab A7 Lite हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त टॅबलेट आहे. चला जाणून घेऊया त्यांची किंमत आणि वैशिष्ट्यांविषयी.

Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite यांची किंमत

Samsung Galaxy Tab S7 FE ची किंमत 46,999 रुपये आहे. या किंमतीत, 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध असेल. त्याचबरोबर 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 50,999 रुपये आहे. हा टॅब मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन, मिस्टिक पिंक आणि सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.

- Advertisement -

Samsung Galaxy Tab A7 Lite 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज मॉडेल आणि LTE व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. फक्त वाय-फाय मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे. हा टॅब ग्रे आणि सिल्वर रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही टॅब 23 जूनपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Samsung Galaxy Tab A7 Liteमध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड वन यूआय कोअर 3.1 आहे. या टॅबमध्ये 1340×800 पिक्सलच्या रिजोल्यूशनसह 8.7-इंचाचा डब्ल्यूएक्सजीए + डिस्प्ले आहे. टॅबमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर मीडियाटेक हेलियो पी 22 टी (एमटी 8786 टी) आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.