ऐतिहासिक: सर्वसामान्य 4 नागरिकांची पहिल्यांदाच अंतराळ सफर, इलॉन मस्कच्या SpaceX ने रचला इतिहास

0

- Advertisement -

फ्लोरिडा: आत्तापर्यंत अंतराळात जाण्याचे भाग्य काही प्रशिक्षित अंतराळवीर आणि प्राण्यांनाच मिळाले होते. जगातील हि सर्व अंतराळ उड्डाणेही सरकार पुरस्कृत होती. सर्वसामान्य माणूस विमानात बसून आकाशात जात होता परंतु अंतराळ कक्षेत सफर मात्र त्याच्यासाठी स्वप्नच होते. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम टेस्ला कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या Space X  कंपनीने केले आहे.

स्पेस मिशन कंपनी स्पेसएक्सने पृथ्वीच्या अंतराळ कक्षेत केवळ नागरिकांना पाठवून इतिहास घडविला आहे. खाजगी व्यावसायिक अंतराळ उड्डाणाच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे. “प्रेरणा 4” नावाचे स्पेस एक्सचे हे यान नागरिकांना घेऊन गुरुवारी अंतराळात झेपावले. त्यात जाणाऱ्या चार जणांच्या क्रूने उड्डाणापूर्वी मस्कची भेट घेतली.

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन 9 रॉकेटसह ड्रॅगन कॅप्सूल प्रक्षेपित करण्यात आले. या ठिकाणावरूनच अपोलो 11 मोहिमेने चंद्रावर आपल्या मोहिमेसाठी उड्डाण केले होते.

- Advertisement -

हे अंतराळ यान 575 किमी उंचीवर गेले, जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षाही जास्त अंतर आहे. तीन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. यातील सर्व सहभागी नागरिक हे अमेरिकतील आहेत.

अब्जाधीश जेरेड इसाकमन यांनी या पहिल्या वहिल्या खाजगी अंतराळ सफरीसाठी निधी दिला आहे. मात्र, स्पेसएक्सने त्याच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही. या खाजगी अंतराळ सफरीसाठी लाखो डॉलर्स खर्च आला असण्याची शक्यता आहे. यामध्ये इसाकमन सोबत असलेल्या इतर तीन सदस्यांची एका स्पर्धेद्वारे निवड करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.