सावधान: डिजिटल पेमेंटमध्ये येऊ शकतात अडचणी, यूपीआयवरील लोड वाढतोय

0

- Advertisement -

कोरोनाच्या काळात आर्थिक व्यवहारांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक हे डिजीटल व्यवहार  करू लागले आहेत. गेल्या वर्षीही या व्यवहारात प्रचंड वाढ झाली होती. मागील दोन महीन्यात डीजिटल व्यवहार करण्यावर नागरिकांचा भर आहे. परंतु व्यवहारात होत असलेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगचे व्यवहार अयशस्वी (transactions fail) होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही बँका दररोज या समस्येशी झगडत आहेत.

बॅंकाच्या म्हणण्यानुसार यूपीआय व्यवहार गेल्या तीन वर्षांत दुप्पट झाले आहेत, जे हाताळणे सोपे नाही. त्यामुळे सावधान..पेमेंट अयशस्वी होण्याच्या समस्या संपणार नसून येत्या काही महिन्यांत ह्या समस्या आणखी वाढतील. गेल्या 1 एप्रिल रोजी ही प्रणालीत प्रचंड समस्या निर्माण झाल्या होत्या. मार्च एण्ड मुळे बॅंकाना या प्रणालीतील व्यवहार पुर्ण करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जवळपास साडेचार लाख रुपयांहून अधिक व्यवहार ठप्प झाले होते.

दररोज हजारो वापरकर्ते यूपीआय पेमेंट प्रणालीद्वारे आपले आर्थिक व्यवहार करत आहेत, त्यामुळे मोबाइल-पेमेंट गेटवे यूपीआय च्या प्रणाली वर प्रचंड ताण येतो आहे. यूपीआय व्यवहारांच्या बोजामुळे मोबाइल आणि डिजिटल पेमेंट सेवा विस्कळीत होत आहेत असे ही प्रणाली विकसित आणि व्यवस्थापन करणा-या राष्ट्रीय पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीयाने म्हटले आहे.

हे ही जाणून घ्या..

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2019 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार युपीआय वापरकर्त्यांनी आपला व्यवहार करताना जर तो पुर्ण झाला नाही तर ज्या बॅंकेमार्फत तो झाला आहे त्या बॅंकेने पैसे पाठविणा-याला ते पैसे लगेचच्या पुढील एका दिवसांत परत करणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

जर दिलेल्या वेळेत पैसे परत करण्यास बॅंका अयशस्वी झाल्या तर बॅंकाना 100 रुपये प्रतीदिन असा दंड आकारण्यात येईल असे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या निर्देशांत म्हटलेले आहे.

पुढे जर असा अयशस्वी झालेला व्यवहार पुर्ण करण्यात अथवा वापरकर्त्याला परतावा देण्यात जर एका महीन्याच्या काळापेक्षा जास्त वेळ लागला तर वापरकर्ते स्थानिक लोकपाल (Ombudsman) यांच्याकड़े ह्या समस्येबद्दल तक्रार करू शकतात. बॅंकाद्वारे स्थानिक लोकपास नेमणे हे The Ombudsman Scheme for Digital Transactions, 2019 च्या नियमाप्रमाणे बंधनकारक आहे.

Pic – NPCI

आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएसचा वापर कमी झाला

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेत ८ टक्क्यांनी घट झाली होती. आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस, एटीएम आणि चेक यासारख्या अन्य पेमेंट मोडचा व्यवहाराला मात देत इंटरनेच बॅंकीग प्रणालीत युपीआय व्यवहारांनी आघाडी घेतली आहे. गेल्या एप्रिल महिन्यातच 2 लाख अब्जांहून अधिक 4 लाख 94 हजार कोटी रुपयांपेक्षा आर्थिक व्यवहार झाले असल्याचे राष्ट्रीय पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीयाने नुकतेच जाहीर केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.