पहा व्हिडीओ…..एैतिहासिक : भारतीय अभियंत्याने तयार केलेले मंगळावरील ‘Ingenuity’ हेलिकॉप्टरचे उड्डाण

0

- Advertisement -

न्युयार्क:  नासाने मंगळावर पाठविलेल्या पर्सिरव्हन्स रोव्हर या यानाने ingenuity या छोट्या हेलिकॅाप्टर उड्डाणाचे अभुतपूर्व असे चित्रिकरण केले. हे रोव्हर मंगळाच्या जेझेरो क्रेटरमध्ये हेलिकॅाप्टरपासून सुमारे 211 फुट अंतरावर उभे होते.

या हेलिकॅाप्टरने मंगळाच्या पृष्ठभागावरून मंगळाच्या अवकाशात सुमारे 110 मीटर उंच गेल्यानंतर त्याचे यशस्वी लॅंडींगही झाले असे नासा द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एखाद्या दुस-या ग्रहावर असे दुरस्थ पद्धतीने नियंत्रित करून उड्डाण करण्याची ही ऐतिहासिक कामगिरी असून मंगळाच्या पृष्ठभागाचे हवाई सर्वेक्षण करून महत्वाची माहीती गोळा करण्यास त्याची मदत होणार आहे.

पहा व्हिडीओ..

- Advertisement -

 

भारतीय कनेक्शन

मुळचे भारतीय असलेले आणि सध्या अमेरीकेतील नासा संस्थेत काम करणारे डॅा. बलराम हे नासाच्या मंगळ इनज्युनिईटी हेलिकॅाप्टर प्रकल्पाचे मुख्य अभियंता आहेत. त्यांनी ही कल्पना मांडली व प्रत्यक्षात साकारही करून दाखविली. डॅा. बलराम यांनी आयय़आटी चेन्नई येथून यंत्र अभियांत्रिकी मध्ये बी. टेक. पदवी घेतील असून संगणक अभियात्रिकी मध्ये मास्टर आणि डॅाक्टरेट पदवी मिळवलेली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.