Vivo ने पुढे केला मदतीचा हात, करणार 10 कोटींची मदत

0

- Advertisement -

नवी दिल्ली: स्मार्टफोन बनवणार्‍या चीनी कंपनी विवो (Vivo) COVID-19 विरोधातील लढाईत भारताला मदत म्हणून 10 करोड रुपये देणार आहे. या अगोदर Vivo ने 2 करोड रुपयांची मदत जाहीर केली होती, त्यात आता वाढ करत कंपनीने 10 करोड रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.

या पैशांचा वापर ऑक्सिजन concentrators आणि ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यासाठी करण्यात येईल. देशात वाढणारा कोरोना संसर्ग लक्षात घेत कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते.

- Advertisement -

“सध्या आपण सर्व खूप वाईट काळातून जात आहोत. यावेळी सर्वांना एकमेकांच्या मदतीची खूप गरज आहे. यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. ही छोटीशी रक्कम देऊन आपल्या समाजाला आमच्या तर्फे छोटीशी मदत करत असून या संकटाच्या काळात आम्ही सर्व एकमेकांसोबत आहोत.”

-Vivo India

कंपनीने ISKCON या समाजसेवी संस्थेसोबत भागीदारी केली आहे.  या भागिदारीतून एक लाख (1,00,000) खाद्य पोकेट्स गरजूंमध्ये वाटण्यात येतील. हे खाद्य गुरुग्राम मधील पेशंटच्या घरी पोहचवण्यात येणार आहेत. यासोबतच कंपनीने मिड- डे मिल (दुपारचे जेवण) देणार्‍या द अक्षया पत्रा फाऊंडेशन सोबत मिळून Vivo ने दिल्लीतील सरकारी शाळांतील 500 मुलांना हप्पिनेस किट देण्याची योजन आखली आहे.  सोबतच Vivoन तर्फे कार्डियाक अॅम्ब्युलेन्स दान करणर असलायचे समजते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.