जगभरात You Tube डाऊन….य़ुजर्सचा खोळंबा….

0

- Advertisement -

गुगल कंपनीचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म यु ट्युब हा सोमवारी रात्री उशिरा क्रॅश होऊन बंद पडल्याने जगभरातले अब्जावधी वापरकर्ते ऑफलाइन झाल्याने यु ट्युबर्सनी रोष व्यक्त केला.

जगभरातल्या विविध ऑनलाईन सेवांच्यावर लक्ष ठेवणा-या डाऊन डिटेक्टर या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार. अ‍ॅप आणि वेबसाइट दोघेही सोमवारी मध्यरात्री बंद पडले होते. डाऊन डिटेक्टरच्या मते, 8,000 हून अधिक लोकांनी युट्युबच्या सेवेमध्ये समस्या येत असल्याचे नोंदविले.

वापरकर्त्यांनी होमपेज लोड करणे, लॉग इन करणे किंवा व्हिडिओ प्ले करणे अशक्य असल्याचे ऑनलाईन आउट्रेज ट्रॅकर ऑन डाऊनटेक्टर वर नोंदवले.

दरम्यान तासाभरानंतर सेवा पूर्ववत करण्यात आल्या. समस्येचे मुळ कारण आणि समस्या नेमकी किती व्यापक होती ह्या दोन्ही अजूनही समोर आल्या नाहीत.

YouTube प्लॅटफार्म सुरळित सेवेच्या बाबतीत अत्यंत विश्वासार्ह आहे आणि त्याच्या सेवांवर सहसा परिणाम होत नाही किंवा तसे प्रकार दुर्मिळ आहेत.

“काही लोकांना वापर करताना थोड्या समस्या आल्या किंवा आज YouTube वरील वापरांदरम्यान अनेकांना सामान्यतः येतो तसा अनुभव आला नाही. आम्ही या समस्येवर त्वरीत काम सुरु केले असून यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” असे य़ुट्युबच्या प्रवक्त्याने सांगितले.

अर्थात तासाभराच्या आतच निर्माण झालेली समस्या सोडविण्यात आली आणि युट्यूबच्या टीमने एका ट्वीटमध्ये म्हटले की, “आम्हाला यूट्यूब होमपेजने 10 मिनिटांपर्यंत सुरु होत नसल्याचे युट्युबर्सकडून कळाले आहे. आम्ही समस्या लक्षात घेऊन समस्या सोडविली आहे. आता कोणत्याही समस्येशिवाय वापरकर्त्यांसाठी होमपेज लोड होईल.”

- Advertisement -

युट्युबच्या वापरात अडथळे येत होते त्यामुळे अनेक लोक त्यांची निराशा रोखण्यासाठी इतर विविध  सोशल मीडियावर गेले.

 

 

 

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.