क्रिकेट टी-20 वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच: आयसीसी

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतात यंदा आक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप आयोजनाबाबतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शंका उपस्थित केली जात होती. परंतु यावर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच आयोजित करण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे. आमच्याकडे पर्यायी योजना तयार असली तरी, सध्या आम्ही त्या योजनांचा फारसा विचार करत नाही असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे (आयसीसी) हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अ‍ॅलर्डाइस यांनी म्हटले आले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आयोजनात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे बरेच अडथळे येत आहेत. तरीही आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

करोनोच्या काळातही विविध देशात क्रिकेट सामने सुरु आहेत. मागील वर्षी आयपीएल भारतात न होता संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाली होती, आम्ही बीसीसीआयशी सतत संपर्कात असून त्यामुळे यंदा होणारा टी-20 वर्ल्डकप तिथे घेण्याचा विचार आयसीसी करू शकेल त्यासाठी पर्यायी योजना तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.