संचारबंदीही सुरु लाखोंचा सट्टा

0

- Advertisement -

अमरावती: जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना बडनेरा-अकोला रस्त्यावरील हॉटेलात सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये आयपीएलसाठी लाखोंचा सट्टा लावला जात असल्याची माहीती मिळल्याने पोलिसांनी कारवाई केली.

बाहेरून बंद असलेल्या हॅाटेलातील एका खोलीत काही सट्टेबाज कोलकाता विरुद्ध बंगळुरू या आयपीएलमधील सामन्यावर मोबाइलद्वारे सट्टा घेत होते. पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख रुपये पेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

या कारवाईत जितेंद्र रामचंद्र धामानी (वय ३७, रा. आययुडीपी कॉलनी, वाशिम), कैलास संजय बसंतवानी (वय २५ रा. सिद्धी कॅम्प कॉलनी, वाशिम) देवेश रामप्रसाद तिवारी (वय ३८, रा. वाशिम) व आशिष रमेशचंद्र सामानी (वय ३२, रा. अकोला नाका, वाशिम) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १९ हजार ८०० रुपये, विविध कंपन्यांचे सुमारे ६१ हजार रुपये किंमतीचे दहा मोबाइल हॅण्डसेट, एक कार, एक एलसीडी टीव्हीसह इतर वस्तू असा एकूण ७ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.