तापसी पन्नू ते अभिषेक बच्चन ‘या’ बॉलीवुड सिलेब्सने दिल्या पीव्ही सिंधुला शुभेच्छा, म्हणाले…

0

- Advertisement -

ऑलिंपिक्स: रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती आणि विश्वचषक विजेती सहाव्या मानांकित स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो येथे महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. तिने आठव्या मानांकित चीनच्या ही बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव करत टोकियोमध्ये पदक पटकावले. यासह ती ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

सिंधूने जिंकलेल्या कांस्यपदकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या दोनवर नेली. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. पदकतालिकेत भारत सध्या संयुक्तपणे 59 व्या क्रमांकावर आहे. बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींसह अनेक कलाकारांनी पीव्ही सिंधूला कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्सने सोशल मीडियावर ‘पीव्ही सिंधू, देशाला तुझा अभिमान आहे’ असे लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.

सनी देओलचे ट्विट.

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांनी ट्विटमध्ये लिहिले- ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे पीव्ही सिंधू. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 2 पदके जिंकणारी तुम्ही पहिल्या महिला आहात. भारत आणि भारतीयांना तुझा अभिमान आहे.

दिया मिर्झानेही दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानेही पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. तिनेट्विटमध्ये लिहिले, ‘पीव्ही सिंधू तू गोल्ड गर्ल आहेस, तुझे अभिनंदन. भारताला तुझा अभिमान आहे ‘.

अभिषेक बच्चनचे ट्विट.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेकने आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आणि दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनल्याबद्दल अभिनंदन. भारताला तुझा अभिमान आहे.

तापसी पन्नूचे ट्विट.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विटमध्ये लिहिले- ‘आमची मुलगी कांस्य पदक घेऊन घरी येत आहे. सिंधूने हे करून दाखवले…’

या कलाकारांशिवाय साई धरम तेज, नेहा धुपिया, अदनान सामी आणि दक्षिणेतील फिल्म इंडस्ट्रीच्या इतर कलाकारांनीही पीव्ही सिंधूला पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.