IPL-14: उर्वरित सामने इंग्लंडमध्ये आयोजित होणार ?

0

- Advertisement -

IPL: चार प्रमुख इंग्लिश काऊन्टी संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या काऊन्टी संघांमध्ये मिडलसेक्स, सरे, वारविक्शायर आणि लँकशायरचा समावेश आहे. काही भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

भारतात या वर्षाअखेर कोरोनाची तीसरी लाट येण्याची दाट आशंका आहे. BCCI सप्टेंबरमध्ये भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर तिथेच आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्याची संभावना शोधत आहेत. हा दौरा 14 सप्टेंबरल पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार लॉर्ड्स, ओव्हल, एजबॅस्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड यांनी ईसीबीला (England Cricket Board) पत्र लिहून आयपीएलचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या अहवालानुसार, ‘सप्टेंबरच्या उत्तरार्धात दोन आठवड्यांत ही स्पर्धा पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.’ बीसीसीआय आणि ईसीबीचे अधिकारी गुरुवारी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी बैठकीत यावर चर्चा करणार असल्याचे समजते. भारतात आयपीएलमध्ये फक्त 29 सामने खेळले गेले असून, अजूनही 31 सामने होणे बाकी आहे.  या हंगामात अंतिम सामन्यासह एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.