ऑक्सिजनसाठी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ ने केली 50 हजार डॉलर्सची मदत

0

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने भारतात खळबळ उडाली आहे. रुग्णालये, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या  कमतरतेमुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. या कठीण काळात, जगभरातून भारताकडे मदतीचे हात येत आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट खेळाडूंनी 50 हजार डॉलर्स (37 लाखाहून अधिक रुपयांची) मदत केली आहे.

युनिसेफच्या कोविड -19 मदत निधीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 50 हजार डॉलर्सची देणगी दिली आहे. या रकमेचा उपयोग भारतातील रूग्णांना ऑक्सिजन, कोविड -19 चाचणी किट पुरवण्यासाठी केला जाईल. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही पंतप्रधान मदत निधीत ऑक्सिजन पुरवठ्याकरिता 37 लाख रुपयांची देणगी दिली होती.

लोकांना मदत करण्याचे आवाहन

- Advertisement -

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या जनतेलाही युनिसेफच्या कोविड-19 मदत निधीत देणगी देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शक्य होईल तेवढी मदत गरजूं पर्यंत पोहोचेल.

“ऑस्ट्रेलिया आणि भारताचे विशेष संबंध आहेत. क्रिकेटवरील परस्पर प्रेम हे आमच्या मैत्रीचे केंद्र आहे. मागील आठवड्यात ब्रेट ली आणि पॅट कमिन्सने भारताला मदत केली. मदतीच्या भावनेतून युनिसेफच्या सहकार्याने कोरोना रूग्णांसाठी निधी गोळा केल्याचा आम्हाला अभिमान आहे.” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रभारी मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.