धक्कादायक: विराट कोहलीने सोडले भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद, काय केले ट्विट वाचा सविस्तर

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, आगामी टी -20 विश्वचषकानंतर आपण टी -20 स्वरूपातील भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका ट्विटद्वारे एका संदेशाद्वारे असा मोठा निर्णय घेण्यामागे कार्यभार व्यवस्थापन अर्थात वर्कलोड मॅनेजमेंट हे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीध्ये होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करेल. टी-20 स्पर्धेसाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. कोहली 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार असून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आगामी मालिकेसाठी तयारी सुरु केली आहे.

येत्या भविष्यात विराट फलंदाज म्हणून संघासाठी योगदान देत राहील, असेही त्याने स्पष्ट केले आहे. 33 वर्षीय विराटने कर्णधार म्हणून प्रवासात पाठिंबा दिल्याबद्दल सहकाऱ्यांसह, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

“मी केवळ भारताचे प्रतिनिधित्व करू शकलो नाही तर भारतीय क्रिकेट संघाचे माझ्या उत्तम क्षमतेने नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. सहाय्यक कर्मचारी, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय ज्याने आम्हाला जिंकण्यासाठी प्रार्थना केली त्यांच्याशिवाय हे मी करू शकलो नाही,” असे त्याने लिहिले.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.