धोनीच्या आई-वडिलांनी केली कोरोनावर मात

0

- Advertisement -

एमएस धोनीच्या आई-वडिलांनी केली कोरोनावर मात

क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या  पालकांनी एकाच आठवड्यात कोरोनावर  मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आठवडाभरपूर्वी झाला होता संसर्ग

- Advertisement -

आठवडाभरापूर्वी धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाच संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, धोनीचे वडील पानसिंग आणि आई देविका देवी यांची प्रकृती सामान्य असून त्यांचे ऑक्सिजन पातळी ठीक आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचला नव्हता असे डॉक्टरचे म्हणणे आहे.

यावेळी संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत असताना झारखंडही त्यातून सुटू शकला नाही. तिथेही संसर्ग वाढत आहेत.

धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे आणि त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज शानदार प्रदर्शन करत आहे. सध्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ प्रथम क्रमांकावर आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.