आयपीएलचे उर्वरित सामने होऊ शकतात इंग्लंडमध्ये, लवकरच घेतला जाऊ शकतो निर्णय

0

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 29 मे रोजी विशेष बैठक बोलविली आहे. या बैठकीत आयपीएल 2021 चे उर्वरित सामन्यांच्या आयोजना सोबतच पूर्वनियोजित टी-20 विश्वकप भारतात आयोजित होईल की नाही याबाबत चर्चा केली जाणार आहे. ही बैठक ऑनलाइन डिजिटल माध्यमांद्वारे होणार आहे. बीसीसीआयने टी-20 विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पर्याय म्हणून संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई (UAE) मध्ये खेळविण्याचा विचार करीत आहे.

आयपीएल 2021चे  बाकीचे सामने इंग्लंड मध्ये खेळवले जाऊ शकतात. भारतीय संघाला न्यूझीलंडबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामान्यांचे आयोजन करण्यासाठी इंग्लंड चांगले ठिकाण ठरू शकते.

त्याचबरोबर टी -20 विश्वचषक भारतातच आयोजित करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे परिस्थितीत बदल झाल्यास, आयोजनाच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला जाऊ शकतो. तथापि, या दोन्ही बाबींविषयी अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसून, 29 मे रोजी होणार्‍या बीसीसीआयच्या बैठकीनंतरच वास्तविक परिस्थिती कळेल.

आयपीएल इंग्लंडमध्ये आयोजित करणे चांगले: केविन पिटरसन

- Advertisement -

आयपीएलचे पुढे ढकललेले सामने सप्टेंबरमध्ये यूएईऐवजी इंग्लंडमध्ये व्हावेत, अशी इच्छा इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने व्यक्त केली आहे.

“मी पाहिले आहे की लोक सप्टेंबरमध्ये युएईमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्याविषयी बोलत आहेत, पण मला वाटते की ते सामने इंग्लंडमध्ये व्हायला हवेत.” असे पीटरसन म्हणाला आहे.

इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळल्यानंतर भारताचे आणि इंग्लंडचे  मुख्य खेळाडू इंग्लंड मध्येच असतील. त्यामुळे त्यांना पुन्हा यूएई मध्ये विलगीकरण पाळायची गरज पडणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने इंग्लंड मध्ये खेळवणे फायद्याचे आणि वेळ वाचवणारे ठरतील, असे पिटरसन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.