मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल: तुमचा पाठिंबा कोणाला ?

आयपीएलचा अश्वमेध

0

- Advertisement -

अक्षय देशपांडे

मुंबई: सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा राजकीय वाद आपल्या महाराष्ट्रात सुरू असताना क्रिकेटच्या मैदानात सुद्धा  अशीच एक लढत दोन मोठ्या संघात आपल्याला पहावयास मिळणार आहे . क्रिकेट प्रेमींसाठी आजचा सामना महत्वाचा असेल कारण गत विजेत्या मुंबई समोर उपविजेत्या दिल्ली चा संघ पुन्हा एकदा झुंज देण्यास सज्ज आहे .

मुंबई इडियन्स संघ आपल्या आधीच्या सामन्यात हैद्राबाद संघाचा पराभव करून विजयी आत्मविश्वासा सह आज मैदानात उतरेल . संघाची जमेची बाजू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा ला सुर गवसला असून मुंबई च्या संघ सहकार्‍यांना व तमाम चाहत्यांना आणखी बळ मिळाल आहे . स्टार खेळाडू डिकॉक , रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव ,पंड्या बंधू ,पोलार्ड आणि बूमराह अशा तगड्या खेळाडू असलेल्या मुंबई संघात गोलंदाजी व फलंदाजी चे संतुलन पहावयास मिळत असताना त्या संघापुढे मोठे आवाहन असणार ते दिल्ली संघाचे.

कारण ,दिल्ली संघ कर्णधार ऋषभ पंत याच्या नेतृत्वात पंजाबला पराभूत करून मुंबईचा विजयी रथ रोखण्यास सज्ज झालेला आहे .त्यांचा शिखर धवन हा तूफान फटकेबाजी करुन संघाची फलंदाजीआणखी मजबूत करत ऑरेंज कॅप पटकावून आपल्या सहकर्‍यांना प्रोत्साहन देतोय , त्याला खरी साथ पृथ्वी शॉ , ऋषभ पंत यांची मिळत आहे. अजिंक्य राहणे यास मात्र आणखी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण दिल्लीच्या संघात परदेशी स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ व गत पर्पल कॅप विजेता गोलंदाज रबाडा यांच्या येण्याने संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे . नाणेफेक कोणत्या संघाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे ठरेल. एका बाजूला देशाची राजधानी दिल्ली तर समोर देशाची आर्थिक राजधानी मुंबई असा आजचा सामना खर्‍या अर्थाने रंगतदार होणार व क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी ठरणार यात वाद नाही.

स्पर्धेच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल तिसर्‍या स्थानी तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

तर मग तुमचा पाठिंबा कोणत्या संघाला ? comment करा

दोन्ही संघ आमने-सामने

एकूण सामने – 28

दिल्ली विजय – 12

मुंबई विजय – 16

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.