खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने – पंतप्रधान

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशातील खेळाडूंना त्यांच्या सर्वोच्च कामगिरी बद्दल देण्यात येणारा खेल रत्न पुरस्कार आता भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.

खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतला अभिमान आणि सन्मानाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या खेळाडूंमध्ये  मेजर ध्यानचंद हे अग्रगण्य होते. आपल्या देशाच्या सर्वोच्च  क्रीडा सन्मानाला त्यांचे नाव देणे उचित होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. संपूर्ण देशभरात हॉकी प्रती नव्याने रुची निर्माण होत आहे. येत्या काळासाठी हे अतिशय सकारात्मक चिन्ह आहे, असे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नाने देशाचे मन जिंकले आहे. विशेषकरून हॉकी मध्ये आपल्या मुला-मुलीनी जी इच्छाशक्ती,जिंकण्यासाठीची झुंजार वृत्ती  यांचे घडवलेले दर्शन वर्तमान आणि येत्या काळासाठी मोठी प्रेरणादायी आहे.

- Advertisement -

देशाला अभिमानास्पद अशा या क्षणी खेल रत्न पुरस्काराला  आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जावे अशी जन भावना व्यक्त करण्यात येत होती. या लोक भावनेचा आदर करत या पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.