रोहित शर्मा होईल भारतीय संघाचा कप्तान ?

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघात येत्या कालावधीत काही मोठे बदल होण्याची शक्यता असून कर्णधार विराट कोहली युएई आणि ओमानमध्ये 2021 टी 20 पुरुषांच्या विश्वचषकानंतर राजीनामा देण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अर्थात या वृत्ताला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या ही प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी T20 विश्वचषकानंतर हे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.

विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे असे मानले जाते. टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. रोहितला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी रोहित शर्माने नेतृत्त्व सिद्ध केले आहे. IPL मध्येही त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचे रेकॉर्ड रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.

काही महिन्यांपूर्वी भारतात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान प्रथमच, रोहित कर्णधार असताना उत्तम कामगिरी केली तसेच जेव्हा विराटची कामगिरी ढासाळत होती, तेव्हा रहाणेने त्याच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकली आणि रोहितने चांगले प्रदर्शन केले होते.

- Advertisement -

क्रिकेट खेळात वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याची वेळ आली असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये जोरकसपणे सुरु आहे.

कोहलीने संघाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक सामने जिंकले असले तरी आयसीसीची मोठी ट्रॉफी जिंकण्यात त्याला आलेले अपयश ही त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्न उपस्थित करीत असल्याचे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जूनमध्ये साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा पराभव झाला होता.

दरम्यान, 34 वर्षीय रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे 10 वेळा नेतृत्व केले आणि आठ वेळा त्यांना विजय मिळवून दिला. टी -20 मध्ये त्याने 19 वेळा कर्णधारपद भूषवले आहे त्यापैकी त्यांनी 15 जिंकले आणि चार गमावले.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.