पी. व्ही सिंधूने पटकावले कांस्य पदक, ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळविणारी एकमेव भारतीय

0

- Advertisement -

टोकियो: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या बिंग जाओचा २१-१३, २१-१५ असा पराभव करुन कांस्य पदक (ब्राँझ) जिंकले. या विजयामुळे पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी एकमेव भारतीय बनली आहे. याआधी तीने रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.

टोकियोत सुरु असलेल्या या स्पर्धांत भारताच्या वेटलिफ्टर मिराबाईने चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. यामुळे भारताच्या खात्यात एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके जमा झाली आहेत. भारताच्या सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

- Advertisement -

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

किंवा Telegram चॅनल: https://t.me/Deccanviews मध्ये सहभागी व्हा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.