आजपासून राज्यभर संचारबंदी

रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू, अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद.

0

- Advertisement -

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी (13 एप्रिल) जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना त्यावरील होत असलेल्या उपाययोजनांचेही तपशील दिले होते. त्यावेळी ‘ब्रेक द चेन’ ही घोषणा करीत आज बुधवार (14 एप्रिल)  पासून त्यांनी नागरीकांसाठी येत्या 15 दिवस संचारबंदीसाठी काही नियमावली जाहीर केली. राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लागू नसतील. मात्र, मतदान पाड पडल्यानंतर या मतदारसंघातही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

‘ब्रेक द चेन’ नियमावली

सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरुच परंतु फक्त अत्यावश्यक कामांसाठीच वापर. अत्यावश्यक सेवा म्हणजे रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये,

पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील.

कामगारांची व्यवस्था

बांधकाम, अन्य उद्योगांना साईट्सवर शक्य असेल तर तिथेच कामगारांची सोय करण्याचे  तसेच त्यांच्या आरोग्याची खबरदारी आणि कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचे आदेश.

- Advertisement -

हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची होम डिलिव्हरी, पार्सल सेवा सुरु

हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरु राहतील.

रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी परंतु फक्त पार्सल व्यवस्थाच सुरु ठेवावी.

पाणीपुरवठा, शेतीची काम करण्यास मुभा

इलेक्ट्रिक, गॅस पुरवठा, एटीएम सुरु राहतील

घरोघरी वर्तमानपत्रांचं वाटप सुरु राहतील

सिनेमागृह, चित्रिकरण बगीचे, व्यायामशाळा बंद

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.