ऑक्सिजनचा योग्य वापर करा: आरोग्यमंत्र्यांच्या सुचना

राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा, ऑक्सिजन, रेमिडीसिव्हर, बेड मॅनेजमेंटसाठी मुख्य सचिवांना आदेश

0

- Advertisement -

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनचा योग्य वापर करावा. खासगी हॉस्पिटल 50 बेडवरचं असेल तर ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावले पाहिजेत. बेड्सची संख्या वाढविली पाहीजे तसेच लक्षणं कमी असतील तर इंजेक्शन्स्चा वापर कमी करावा अशा सुचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याच्या, बेड न मिळणे, इंजेक्शन्स् न मिळणे अशा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ह्या सुचना केल्या आहेत.

तसेच बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात येत असून भिलाई, तेलंगणा ,कर्नाटकमधून काही ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याचे. तसेच आता 15 दिवस निर्बंध घातल्याने अवधी मिळत असल्याने बेड वाढवले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये बेड वाढवा. रुग्णालयांचे 80% बेड ताब्यात घेतले पाहिजेत. खासगी रुग्णालयांचे ऑडिट चेक केलं पाहिजे. खासगी रुग्णालयांनी बिलं काढताना प्रोटोकॉल पाळणं आवश्यक आहे. तसेच चोवीस तासात टेस्टिंग रिपोर्ट आलाच पाहिजे हा दंडक आहे, असेही त्यांनी सुचित केले.

- Advertisement -

टास्क फोर्सने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर वापर बाबत गाईडलाईन्स काढली आहे. रेमडीसीविर सुद्धा योग्य पध्दतीने वापरलं पाहिजे.  50 हजार दररोज इंजेक्शन मिळायचे. आता 40 हजार मिळत आहेत. पण योग्य वापर केला तर यातही भागू शकेल. डॉक्टर लक्षणं कमी असताना हे इंजेक्शन वापरत आहेत. कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. येत्या काही कालावधीत लाख भर इंजेक्शनस् राज्याला मिळतील असं ते म्हणाले.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.