राज्यात करोनाचे थैमान कायम; २४ तासांत ६१ हजार नवे रुग्ण

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ६१ हजार ६९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सक्रिय रुग्णांचा आकडा आता सहा लाखांचा टप्पा ओलांडून ६ लाख २० हजार ६० इतका झाला आहे. करोनाचा उद्रेक कायम असून आज पुन्हा एकदा उच्चांकी रुग्णसंख्यावाढ झाली आहे.

राज्यात करोना मृत्यूंचा आकडाही वाढत असून आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात तब्बल ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून तो काहीसा दिलासा ठरला आहे. राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. १ मे पर्यंत संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी गर्दी अजून कमी झालेली नाही. त्याचा मोठा फटका करोना विरोधी लढ्याला बसत आहे. करोनाचे दररोजचे आकडे अजूनही कमी झालेले नाहीत हेच आजच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

आजची स्थिती…

- Advertisement -

आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३ % एवढा
आज ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोना बाधित रुग्ण करोनामुक्त
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ टक्के एवढे
सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होम क्वारंटाइन, तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन

सक्रिय रुग्ण सहा लाखांवर
राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा सहा लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. आजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात सध्या १ लाख १२ हजार ९२३ रुग्ण असून त्यानंतर मुंबई पालिका क्षेत्रात ८४ हजार ७५३ इतके रुग्ण आहेत. ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे ८३ हजार १९३ आणि ६९ हजार ३६५ जण करोनाचे रुग्ण सापडले आहेत. नोंदीनुसार जिल्ह्यात ४७ हजार ११७ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे पालिका क्षेत्रात आझ ८ हजार २०९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ४६९ रुग्णांची भर पडली.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.