दुर्घटना: मुंबईत इमारत कोसळून 11 ठार

0

- Advertisement -

मुंबई : मुंबई काल (9 जून) झालेल्या पावसामुळे मालाड पश्चिम उपनगरातील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे.

सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

- Advertisement -

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.शह

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.