मुंबईत 35 दिवसात उभारण्यात आले 2170 बेडचे जंबो कोविड-19 रुग्णालय, जाणून घ्या सविस्तर माहिती

0

- Advertisement -

मुंबई: देशभरात कोरोनाचे नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु, कोरोनाच्या डेल्टा प्लस स्वरुपाच्या वाढत्या प्रकरणांनी आणि तिसर्‍या लाटेच्या शंकेने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. अशातच सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर दिला आहे. दुसर्‍या लाटेत अपुर्‍या आरोग्य सुविधांमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही नवीन रुग्णालये आणि आरोग्य सुविधा सुरू करण्यात येत आहेत. राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या हेतूने, मुंबईत 2170 बेडचे एक मोठे कोविड रुग्णालय उभारले आहे.

मुंबईतील मालाड मध्ये 35 दिवसात उभारण्यात आलेले हे जंबो कोविड रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे रुग्णालय पुर्णपणे अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे. यातील 70 टक्के बेड्स ऑक्सिजनयुक्त असून 384 बेड्स विलगीकरण खोल्यामध्ये ठेवण्यात आले आहेत.

या रुग्णालयात मुलांसाठी 42 आयसीयू बेड्स, 20 बेड डायलिसिससाठी ठेवण्यात आले असून, सुरक्षा आणि निगराणीकरिता 240 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे रुग्णालय मुंबई विकास प्राधिकरणाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.  ट्विट मध्ये म्हटले आहे की, “दुपारी एमएमआरडीएने मालाडमध्ये बांधलेले मोठे कोविड रुग्णालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीएमसीच्या ताब्यात दिले आहे. 2170 बेड असलेल्या या रूग्णालयात ऑक्सिजन बेड, आयसीयू, बालरोग आयसीयू, डायलिसिस आणि इतर आवश्यक सेवा आहेत.”

- Advertisement -

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

 

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.