पालघर येथील भारत केमिकल प्लांटमध्ये स्फोट, 5 कर्मचारी जखमी

0

- Advertisement -

पालघर: जिल्ह्यातील एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाला असून त्यानंतर लागलेल्या आगीत 5 कर्मचारी होरपळले आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा दरम्यान घडली आहे.

बोईसर औद्योगिक क्षेत्रात हा प्रकार घडल्याचे अग्निशमन अधिकार्‍याने सांगितले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य राबवले.

बोईसर पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याने PTI वृत्तसंस्थेला सांगितले की, “स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये 5 कर्मचारी होरपळले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्फोटाचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे.”

वृत्तसंस्था एएनआय च्या माहितीनुसार ही घटना भारत केमिकल्समध्ये घडली आहे. जखमींना ठुंगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.