लस निर्यात केली नसती तर संकटाची वेळ टळली असती – अजित पवार

0

- Advertisement -

पूणे: देशात तीव्र झालेल्या कोरोनाच्या संकटाला केंद्र सरकारच जबाबदार आहे, जर भारतात तयार होणारी लस इतर देशात निर्यात  केली नसती तर आज उभी राहीलेली कोरोनाची संकटाची ही वेळ टळली असती. तसेच लस निर्यात केल्यामुळे लसीकरण मोहीमेत येणा-या अडचणी टाळता आल्या असत्या असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य एकरकमी लागणारी लस खरेदीस तयार आहे असे म्हंटले होते. त्यालाच दुजोरा देत पवारांनी राज्यात एकूण 12 कोटी लसींची आवश्यकता आहे आणि त्याच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम वा भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांकडून एकरकमी पैसे देण्यासाठी तयार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

 

- Advertisement -

तसेच केंद्राने परवानगी दिली तर राज्य फायझर, स्पुटनिक, मॅाडर्ना इतर परदेशी कंपन्यांच्या लसीही खरेदी करून आयात करू शकतो. असेही ते म्हणाले.

राज्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरु होत असून राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दुर करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.