संतापजनक घटना; दुसरं लग्न केले म्हणून जात पंचायतीची विकृत शिक्षा

0

- Advertisement -

महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यामध्ये एका ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेला दुसरे लग्न केले म्हणून जात पंचायतीने थुंकी चाटण्याची विकृत शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे. तसेच तिच्या ह्या कृत्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षाही जात पंचायतीने दिली असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात घडलेल्या या घटनेतील महत्वाची गोष्ट अशी की या महिलेने जात पंचायतीविरुद्ध हिंमत दाखवत दोन्ही शिक्षा नाकारल्या आहेत. तसेच पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे.

जळगावमध्ये राहत असणाऱ्या या महिलेच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी जात पंचायतीच्या १० सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जळगावमध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी, आता हे प्रकऱण जिथे ही जात पंचायतीचे आयोजन कऱण्यात येऊन शिक्षा सुनावण्यात आली तिथल्या म्हणजेच अकोल्यातल्या पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दाखल कऱण्यात आले आहे.

- Advertisement -

या तक्रारीनुसार, अकोला जिल्ह्यातल्या वडगाव या गावात ९ एप्रिल रोजी, नाथ जोगी समाजातल्या सदर महिलेने दुसरे लग्न केल्यामुळे ही जात पंचायत भरवण्यात आली होती. पंचायतीने तिचे दुसरं लग्न मान्य केले नसल्याचे सांगितले. जात पंचायतीच्या या सभेमध्ये तिची बहीण आणि इतर नातेवाईकांना बोलावण्यात आले आणि या प्रकऱणाचा ‘निकाल’ देण्यात आला. त्यानुसार, जात पंचायतीचे सर्व सदस्य एका केळीच्या पानावर थुंकतील आणि त्या महिलेला हे चाटावे लागेल, तसंच या महिलेला एक लाख रुपयांचा दंडही जात पंचायतीकडे भरावा लागेल, अशी शिक्षा तिला देण्यात आली. ही शिक्षा भोगल्यानंतरच तिला तिच्या समाजामध्ये परत स्वीकारण्यात येईल असं सांगण्यात आले.

सदर महिलेने २०१५ मध्ये लग्नाच्या चार वर्षांनंतर आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर तिने २०१९ साली दुसरं लग्न केले होते. महिलेला नातेवाईकांनी तिला या घडल्या प्रकाराची माहिती दिली. हे कळल्यानंतर तिने त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकाराचा अधिक तपास सुरु आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.