मुंबईच्या कोविड मॉडेलबद्दल केंद्राने केले राज्य सरकारचे कौतुक

0

- Advertisement -

देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्र देशातील कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक आहे. मागील काही दिवसांत मुंबई शहरसुद्धा कोरोनामुळे खूप प्रभावित होते. आता मुंबईसोबतच महाराष्ट्र राज्यात नवीन कोरोनाबधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट थोपविताना महाराष्ट्र सरकारच्या कार्यप्रणालीसाठी (उपाय योजनांसाठी) केंद्र सरकारने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेेचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने वाढत होते. पण निर्णय विकेंद्रीकरण आणि उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे मुंबईतील कोरोनाचा वाढता आलेख सध्या काही प्रमाणात कमी झाला आहे. यासाठी सध्या राज्यात सुरू असलेले कठोर निर्बंध देखील उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने मुंबईतील नव्या कोरोना बाधितांची संख्या आणि शहरातील कोविड-19 ची परिस्थिती त्वरित कशी सुधारली यावर चर्चा केली. राज्यातही नव्याने कोरोंना बाधित होणा-यांची संख्या हळूहळू कमी होत असून, रोगातून बरे होऊन घरी जाणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.