चिकन, मटण आणि आंब्याची दुकाने वीकेंडलाही राहणार सुरु

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात सुरु असलेल्या निर्बंधात 15 मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत खाद्यपदार्थांची दुकानं, किराणा दुकान तसेच शेती साहित्याची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.

शनिवार व रविवार (वीकेंड) हे दोन दिवस औषधांची दुकाने वगळता पुर्ण लॅाकडाऊन असेल असा निर्देश होता.

- Advertisement -

परंतु आता त्या नियमांत सुधारणा करण्यात आली असून शनिवार आणि रविवार ह्या वीकेंड लॅाकडाऊन मधून चिकन, मटण, पोल्ट्री तसेच आंब्याची दुकाने ह्या दुकानांना खुले राहण्यास तसेच त्या मालाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता सोमवार ते शुक्रवार आणि वीकेंड लॅाकडाऊन असे सातही दिवस उपरोल्लेखित दुकाने व त्यासंबधी वाहतूक ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सकाळी 11 वाजल्यानंतर त्याची घरपोस सेवा सुरु राहील.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.