मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला करणार संबोधित

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात कोरोनाची स्थिति हळूहळू नियंत्रणात येत असून नवीन रुग्णवाढीचा दर कमी होताना दिसत आहे. यासोबतच राज्यात 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत  1 जूनला संपणार आहे. यात पुन्हा वाढ होईल की नाही याबाबतयाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.  रुग्णसंख्या कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. यामुळे पुर्णपणे लॉकडाऊन शिथिल होणार नसल्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी ते याबाबत नागरिकांना संबोधित करणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात लॉकडाउन शिथिल होईल? कुठे होणार नाही? कोणत्या क्षेत्राला दिलासा मिळेल? तिसर्‍या लाटेची काय तयारी आहे? इत्यादि बाबत ते बोलणार असल्याची शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे ते थेट नागरिकांशी जुडणार आहेत.

राजेश टोपेंनी लॉकडाऊन 2 आठवडे वाढण्याचा दिला होता इशारा

- Advertisement -

मागे काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये 2 आठवड्याची मुदतवाढ होणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते,  ‘कोरोना संसर्गाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोविड पॉजिटिव दर जास्त आहे किंवा बेडच्या उपलब्धतेत समस्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन आम्हाला वाढवायचे आहे. परिस्थितीनुसार आम्ही काही ठिकाणी निर्बंधात सूट देऊ शकतो. राज्यात बरे होण्याचा दर 93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.’

मात्र, यावर अधिकृत निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले होते. आज यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रुग्णासंख्या कमी होत असल्यामुळे काही क्षेत्रांना सूट देण्यात येणार असल्याचेही राजेश टोपेंनी वक्तव्य केलं होतं. त्यात कोणते क्षेत्र असतील आणि त्यांना किती सूट दिली जाईल याबाबतही मुख्यमंत्री बोलतील असा अंदाज आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.