चिंताजनक: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच, शनिवारी सापडले 9 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

0

- Advertisement -

मुंबई: देशासह राज्यातही कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल शनिवारी (3 जून) राज्यात 9,489 नवे कोविड-19 रुग्ण सापडले आहेत आणि 153 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 8,395 रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटर वर ही माहिती दिली आहे. राज्यात एकूण कोविड बाधितांची संख्या 60,88,841 झाली असून एकूण मृत्युंची संख्या 1,22,724 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 58,45,315 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यभरात 1,17,575 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्याचा कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर 96 टक्के असून मृत्यू दर 2.01 टक्के आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात सुमारे 2,24,374 नमून्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 4,23,20,880 नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. काल मुंबईत 1822 नवीन रुग्ण सापडले असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात कोविड चाचण्यांचा वेग वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे. कोरोनाचे खतरनाक स्वरूप डेल्टा प्लसमुळे राज्य सरकारने चाचण्यांची संख्या आणि वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. लवकरात लवकर 60% लोकसंख्येचे लसीकरण करण्यात येईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.