दिलासादायक….मुंबई, पुण्यात रुग्णवाढीत घट…..

महापालिका सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

0

- Advertisement -

मुंबई: शनिवारी संध्याकाळी मुंबईत 5888 नवीन रुग्णांची नोंदल झाली तर आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8549 इतकी होती. रुग्ण बरे होण्याचा दर हा 85 टक्के आहे. शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या 7221 आणि गुरुवारी 7410 च्या तुलनेत शनिवाही घट झाली असल्याची माहीती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

या शहरात आज संध्याकाळ पर्यंत संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत सुमारे 40,000 कोविड चाचण्या घेण्यात आल्या असून शुक्रवारी अंदाजे 42000 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मुंबईतील कोविड प्रकरणांचा एकूण विकास दर 1.26 टक्के इतका आहे.

महापालिका सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी शहरातील 12 रुग्णालयांसाठी 16 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभे करण्यात येणार असून ते दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवतील. त्यासाठी सुमारे 90 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून प्रकल्प महिन्याभराच्या कालावधीत पुर्ण होतील असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान आजही, 66,8366 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, जवळपास सात लाख सक्रिय रुग्णांसह महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त कोविड संकटात सापडलेले राज्य आहे.

- Advertisement -

 

पुण्यातही रुग्णसंख्येत किंचित घट

पुण्यात कोविड साथीवरच्या उपाययोजनांना काहीसे यश मिळत असून आज सलग सहाव्या दिवशी नवी रुग्णसंख्या कोरोनामुक्त संख्येपेक्षा कमी झाली असल्याचे पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून सांगितले. आज पुण्यात 3991 नवे रुग्ण आढळून आले तर 4789 ब-या होणा-या रुग्णांची संख्या 4789 इतकी राहीली.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.