मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लिनचिट ?

0

- Advertisement -

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बहुचर्चित 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपामध्ये काहीच पुरावे सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या प्राथमिक तपास अहवालात म्हटल्यात आल्याचे वृत्त टिव्ही9 या वृत्तवाहिनीने तसेच लोकमत या वृत्तपत्राने दिले आहे.

सीबीआयच्या एकूण 65 पानी अहवाल माध्यमांच्या हाती लागला असल्याचा दावा केला जात आहे. सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी हा प्राथमिक तपास अहवाल दिला असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. या अहवालात माजी गृहमंत्री यांच्या विरोधात एकही पुरावा सापडला नसून त्यामुळे त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधातली चौकशी थांबविण्यात यावी तसेच पुढील कारवाईही थांबविण्यात यावी असे या अहवालात म्हटले असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

नेमके प्रकरण काय, आरोप कोणते ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावून दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले.

- Advertisement -

पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.

 दरम्यान अनिल देशमुख यांची ईडी अर्थात अंमलबजावणी संचनालयानेही चौकशी सुरु केली आहे. देशमुखांना आतापर्यंत 5 समन्स बजावले गेले परंतु ते अजूनही या चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.